104 वर्षीय कुट्टीअम्मा यांनी राज्य शिक्षण परीक्षेत 100 पैकी 89 गुण दाखविली शिक्षणाची गोडी

0

केरळ :

जर उत्साह जास्त असेल तर खडतर मार्गही सोपे होतात, काही करण्याची जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. केरळच्या आजी अम्मा कुट्टियम्मा यांनी अशक्य गोष्ट शक्य करत हे साध्य केले आहे.

लिहिण्या-वाचायला आणि शिकायला वय नसतं हे त्या आज्जीनी सिद्ध करून दाखवलं आहे . कोट्टायम जिल्ह्यातील 104 वर्षीय कुट्टीअम्मा यांनी राज्य शिक्षण परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवून लोकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

केरळचे शिक्षण मंत्री वायुदेवन शिवनकुट्टी यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर 104 वर्षीय कुट्टीअम्मा यांनी राज्य सरकारच्या निरंतर शिक्षण उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याचे एक फोटो शेअर केला आहे . केरळ राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण हे राज्य सरकारद्वारे चालवले जाणारे मिशन आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी साक्षरता, सतत शिक्षण आणि आजीवन शिक्षणाचा प्रसार करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

ही कामगिरी केल्याबद्दल केरळच्या शिक्षणमंत्र्यांनी कुट्टीअम्मा यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘कोट्टायम जिल्ह्यातील 104 वर्षीय कुट्टीअम्मा यांनी केरळ राज्य साक्षरता अभियान परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवले आहेत.’ यासोबतच शिक्षणमंत्र्यांनी लिहिले की, ‘कुट्टीअम्मा यांनी हे यश मिळवून दाखवून दिले आहे की वाचन आणि लेखनासाठी वय नाही. प्रेम आणि आदराने, मी त्यांना शुभेच्छा देतो.’

कुट्टियम्मा यांना थोडस कमी ऐकू येत. म्हणून जेव्हा केरळ राज्य साक्षरता अभियानाची चाचणी सुरू झाली तेव्हा त्यांनी निरीक्षकांना जे काही बोलायचे आहे ते मोठ्याने बोलण्यास सांगितले. या परीक्षेनंतर जेव्हा कुट्टीअम्मा यांना विचारण्यात आले की तिला यात किती मार्क्स मिळतील, तेव्हा तिने हसून उत्तर दिले, मला जे काही माहित आहे, ते मी परीक्षेत लिहिले आहे.आता नंबर देणे तुमचे काम आहे. विशेष म्हणजे कुट्टीअम्मा कधीही शाळेत गेलेली नाही. तिला फक्त वाचता येत होतं, पण लिहिता येत नव्हतं. साक्षरता प्रेरक असल्याने कुट्टीअम्माला लिहायला शिकवले.आणि त्यांनी हे यश संपादन केलं आहे.

See also  समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्पला  तत्वतः मान्यता

https://twitter.com/VSivankuttyCPIM/status/1459008890708758531?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1459008890708758531%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F