पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस.

0

पुणेः

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, पुणे रेल्वे स्टेशन जवळच्या भुयारी मार्गात पाणी साचलेय. तसेच पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात आल्यात.

पुढच्या 4 ते 5 दिवसांत गडगडाटासहीत जोरदार पाऊस

राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात हवामान खात्याकडून येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन तासांपासून जोरदार अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडू नका, अशा सूचनाही हवामान विभागाकडून देण्यात आल्यात.

तामिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा

गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळतोय. तर मध्य महराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलाय. राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला. बंगालच्या उपसागरापासून तामिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

06 ऑक्टोबरला परतीचा पाऊस

दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.

हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट

See also  प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक.

4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

5 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली 4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर,

6 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे

7 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग