शिवाजीनगर :
३० मे २०२३, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ आणि त्यानिमित्त स्थापन झालेल्या आयोगाचे कार्य आणि व्यापकता यावर प्रथमच पुण्यात आयोजित केलेला नागरिक आणि प्रशासन संवाद काल घोले रोड म.न.पा.क्षेत्रीय कार्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडला. राज्य आयुक्त श्री दिलीप शिंदे भा.प्र.से. यांनी नागरिक, मोहल्ला कमिटी सदस्य आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
राज्य लोकसेवा हक्क आयोगांअंतर्गत नागरिकांना पारदर्शक, गतिमान, कालबद्ध सेवा देण्यासाठी ५११ सेवांची निवड करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयाचे उत्तरदायित्व आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून इ-प्रशासना द्वारे जास्तीत जास्त कार्यक्षम सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे राज्य लोकसेवा आयोगाचे उद्दिष्ट आहे.
हा मार्गदर्शनपर संवाद “नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज” आणि “मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती” यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. शामला देसाई अध्यक्ष- NSCC यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले, विक्रमसिंह मोहिते – MCPSS यांनी सूत्रसंचालन सांभाळले, आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार रवी खंदारे उप-आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी केले.
या सेवेची सर्व माहिती नागरिकांना खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा.
aaplesarkar.mahaonline.gov.in
कार्यक्रमाला रमेश रोकडे, Adv. पी.डी. तारे बालेवाडी फेडरेशन, जागृती कामेकर नवसह्याद्री, राहुल वंजारी, शैलजा शहा, उमा शर्मा, जितेंद्र मंडोरा हे मॉडेल कॉलनीतील नागरिक आणि कार्यकारणी सदस्य आणि इतर अनेक नागरिक उपस्थित होते.