प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक.

0
slider_4552

नवी दिल्ली :

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक असल्याची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२१ पासून देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग असणं बंधनकारक असणार आहे. फास्टटॅगच्या या सक्तीमुळे वाहनांना रोख टोल भरावा लागणार नसल्याचं गडकरींनी सांगितलं आहे.

फास्टटॅग असल्याने आता वाहनांचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही वाचणार असल्याचंही गडकरी म्हणाले. त्यामुळे आता सुट्टी दिवशी फिरायला गेल्यावर टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रागांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.

दरम्यान, फास्टटॅगच्या अकाऊंटमधून पैसे वजा झाल्यावर त्या धारकाला संदेश मिळणार आहे. अकाऊंटला तुम्हाला रिचार्ज करावं लागणार असून एका फास्टटॅगच्या अकाऊंटचा कालावधी पाच वर्षाचा असणार आहे. पाच वर्षानंतर तुम्हाला नवीन फास्टटॅग विकत घ्यावा लागणार आहे.

See also  आरटीपीसीआर टेस्टमध्ये असणारी CT Value म्हणजे नक्की काय?