जटोली शिवमंदिरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान

0
slider_4552

पुणे :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या 132 व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले.

दगडूशेठ गणपतीची देशभरातील सर्वात लोकप्रिय मूर्तींपैकी एक आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. जिथे भक्त दर्शनासाठी लांबून येतात. गणेश चतुर्थीचा दहा दिवसांचा उत्सव आजपासून सुरू झाला आहे.

सिंह रथावरून आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जटोली शिवमंदिरात विराजमान झाले आहेत.

See also  'जायका'प्रकल्प उभाणीसाठी केवळ बैठका : मोहन जोशी