कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची भारतीय संघासाठी निवड

0

मुंबई :

भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आज आगामी टी – २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघात कोणाला स्थान दिलं जाईल याची सर्वांनाच उत्सुकता होता. त्यानंतर आता बीसीसीआयने भारताच्या 18 शिलेदारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

बीसीसीआयने 18 खेळाडूंसह नावं जाहीर करत आणखी एक मोठा सुखद धक्का दिला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी संघाचा मेन्टाॅर असणार आहे. त्यामुळे आता धोनीच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

भारतीय संघात विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर या तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आलं आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोंव्हेबर या कालावधीत वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे.

See also  सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका : प्रकृती स्थिर