मुंबई :
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. गांगुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे.
गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं.
सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्याची प्रकृती स्थिर असून चोवीस तासासाठी देखरेखीखाली ठेवले आहे. गांगुलीच्या हृदयात दोन ब्लॉकेज असल्याने त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे वुडलँड्स हॉस्पिटलचे डॉ. आफताब खान यांनी सांगितले आहे.