गाव समाविष्ट बरोबर सुविधा देणे ही बंधनकारक सुस म्हाळुंगे करांची प्रतिक्रिया….

0

महाळुंगे/सुस :-

पुणे शहरालगत असलेली गावे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये बाणेर बालेवाडीला लागून असलेले सुस व म्हाळुंगे गावाचा समावेश महापालिकेमध्ये करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु या गावातही मूलभूत सुविधांचा अभाव असून, ज्याप्रमाणे काही वर्षापूर्वी 11 गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला होता. ही गावे अद्यापही सुविधांपासून वंचित आहेत अशी परिस्थिती आमच्या गावांवर येऊ नये अशी प्रतिक्रिया मात्र येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

गेले अनेक वर्षाचा सुरू असलेला गाव समाविष्ट चा प्रश्न अखेर संपला असल्याचे दिसत असले, तरी ही गावे समाविष्ट करून घेऊन त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा वेळेवर मिळणार का? हा प्रश्न कायमच अनुत्तरीत राहिलेला लक्षात येतो. यामध्ये प्रामुख्याने म्हाळूंगे गावामध्ये पीएमआरडी अंतर्गत हायटेक सिटीची विकास कामे सुरू आहेत. सध्या गाव महापालिकेत समाविष्ट होत आल्याने कोणत्या पद्धतीने विकसित होणार  या संदर्भातही संभ्रम येथील नागरिकांमध्ये दिसत आहे.

याबाबत बोलताना म्हाळुंगे चे सरपंच मयुर भांडे यांनी प्रतिक्रिया दिली की, बाकीची गावांची जशी परिस्थिती झाली आहे. तशी परिस्थिती आमची गावे घेऊन होऊ नये. इतर गावांना पालिकेत नावापुरते घेण्यात आले आहे मूलभूत सुविधांसाठी त्यांना अजूनही भांडावे लागत आहे. प्रथम महानगरपालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा व मूलभूत सुविधा वाढवाव्यात इतर गावासारखे बिकट परिस्थिती होता कामा नये याची दखल घ्यावी.

सुसगावच्या उपसरपंच दिशा अनिल ससार यांनी प्रतिक्रिया दिली की, पीएमआरडी ला वाढत्या लोकसंख्येमुळे गावातील नियोजन राखणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले हीच परिस्थिती महापालिकेत गाव गेल्यानंतर राहू नये. नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तरच महापालिकेमध्ये गाव सामील झाल्याचे सार्थकी लागेल.

See also  पेट्रोल-डिझेल महागाई व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मुळशी येथे शिवसेनेचे आंदोलन