खासदार शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन

0

मुंबई :

माजी खासदार शिवसेनेचे नेते आणि ‘बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक’ अशी ओळख सांगणाऱ्या मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या बहात्तराव्या वर्षी कामानिमित्त गोव्यात गेले असता येथे त्यांचे निधन झाले.

पाच वेळा दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेलेले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून मोहन रावले सर्वांना परिचित होते. मोहन रावले यांना आदरांजली अर्पण करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये रक्त सांडले ला कट्टर शिवसैनिक एक दिलदार दोस्त अशाप्रकारे अचानक सोडून जाईल असे वाटत नव्हते.

1991 पासून सलग पाच वेळा दक्षिण मध्य मुंबईतून खासदार म्हणून मतदार संघाचे नेतृत्व केले. लोकसभेच्या विविध समित्या वरती देखील त्यांनी काम केले. असे परळ ब्रँड शिवसैनिक ओळख असणारे मोहन रावले अचानक गेल्याने शिवसेनेत एक पोकळी निर्माण झाली आहे.

See also  राज्य सरकारने दिली किराणा दुकांनांमध्ये वाईनची विक्री करण्यासाठी परवानगी