कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास मिळणार रजा

0

नवी दिल्ली:

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकादी जबाबदार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यास 15 दिवसांची रजा मिळेल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रजेची मुदत संपल्यानंतर जर कुटुबांतील व्यक्ती रुग्णालयात असल्यास त्याला रुग्ण बरा होईपर्यंत रजेची मुदत वाढवून देण्यात येईल. कोरोना काळात उपचार घेणे, रुग्णालयामध्ये भरती किंवा विलगीकरणात ठेवणे याबाबत सरकारी नोकरदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, त्यासंबंधी मंत्रालयाने सविस्तर आदेश जाहीर केला आहे.

आदेशात मंत्रालयाने म्हटले आहे की, जर सरकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यास 20 दिवसांची रजा मंजूर करण्यात येईल. दरम्यान ‘कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 20 दिवसांनंतर रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला रुग्णालयात केल्याच्या कागदोपत्री पुरावे दिल्यास त्याला रजा मंजूर करण्यात येईल,’ असे मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.

सहकारी कुटुंबातील सदस्य किंवा पालक (अवलंबून असले किंवा नसले तरी त्याच्या सोबत राहणारे) कोविड चाचणी पॉझिटिव्ह असल्यास सरकारी कर्मचार्‍यास 15 दिवसांची खास कॅज्युअल रजा देण्यात येईल.

मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की जर सरकारी कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तीशी थेट संपर्कात आला आणि जर घरात विलगीकरणात असेल तर ‘त्याला सात दिवसांच्या कालावधीत घरातून काम करण्याची मुभा देण्यात येणार आहे.

तसेच पुढे म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्याने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला असेल तरिही जर तो कंटेन्टमेंट झोनमध्ये राहत असेल तर त्याला तो परिसर नॉन कंटेन्टमेंट झोन होईपर्यंत घरातून काम करण्याची मुभा असेल. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू राहतील.

See also  इराणचे सर्वात मोठे जहाज खर्ग आगीनंतर ओमानच्या खाडीमध्ये बुडाले