सफाई कामगारांना प्रकाश बालवडकर व मयुरी बालवडकर यांनी केलेली मदत महत्त्वाची : चंद्रकांत पाटील

0

बालेवाडी :

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाश बालवडकर व भाजपा सदस्य मयुरी प्रणव बालवडकर यांच्या वतीने आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बाणेर बालेवाडी प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, कोरोना पार्श्वभूमिवर देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छतेचे काम करणारे साफ सफाई कामगारांच्या कुटुंबाला आधार मिळावा या हेतूने प्रकाश बालवडकर आणि मयुरी बालवडकर या दोघांनी अन्य धान्य किट वाटपाचा काम केले आहे. या दोघांनी नेहमीच समाजाला काय उपयोगी पडेल याचा विचार करून गरजु लोकांपर्यत मदत पोहोचवली आहे. तसेच साफसफाई कामगारांनी दोन्ही लस घ्यावी म्हणजे आरोग्य सुरक्षित होईल होईल, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

यावेळी मॅक न्यूज शी बोलताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी कामे करावी असे सुचविले होते. त्यांच्या सूचनेचे पालन करून मयुरी बालवडकर यांच्या संकल्पनेतून बाणेर बालेवाडी मधील दुर्लक्षित सफाई कामगारांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. करोना च्या अडचणीच्या काळात त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे बालवडकर यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, मयुरी प्रणव बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, गणेश कळमकर, समीर पाटील, चंद्रकांत पोटे, गणेश घोष, संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, शिवम बालवडकर, प्रशांत हरसुळे, जयंत भावे, जगन्नाथ कुलकर्णी, शंतनू खिलारे, महेश पवळे, शंतनू नारके, उमा गाडगीळ, स्वरुपा शिर्के, सुशील मेंगडे आदि मान्यवर उपस्थित होते.

See also  बालेवाडी रेसिडेन्सी को-ऑपेराटीव्ह हौसिंग वेल्फर फेडेरेशनच्या वतीने कोवीड लसीकरण मोहीम सुरू...