बालेवाडी रेसिडेन्सी को-ऑपेराटीव्ह हौसिंग वेल्फर फेडेरेशनच्या वतीने कोवीड लसीकरण मोहीम सुरू… 

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी रेसिडेन्सी को-ऑपेराटीव्ह हौसिंग वेल्फर फेडेरेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने, संयुक्तपणे एफ रेसिडेन्सी व कम्फर्ट झोन सोसायटी, बालेवाडी येथे कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिनांक १९ जून २०२१ पासून सुरू केली आहे ही मोहीम सहा दिवस चालणार आहे. २५ सहकारी संस्था सदर फेडरेशन चे सदस्य आहेत व एकमेकांच्या सहकार्याने सदर फेडरेशन सदस्य लसीकरण मोहीम उत्तम प्रकारे राबवत आहेत.

बालेवाडी परिसरातील सोसायट्यांनी एकत्रितरीत्या येऊन आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी सरकारी लसीकरण वर विसंबून न राहता ही जबाबदारी पूर्ण आदर्श मोहीम राबवली आहे. याशिवाय बहुतेक सर्व सहकारी संस्था आपापल्या संस्थेतील स्वतःच्या कुटुंबाबरोबर नोकर वर्गाचे लसीकरण देखील करून घेत आहे. सदर मोहिमेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत दोन दिवसांमध्ये जवळपास १२०० नागरिकांनी लसीकरण केले आहे. सुमारे ५००० ते ६००० लोक सदर मोहिमेचा लाभ घेतील असा अंदाज फेडरेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला. लसीकरण सोबतच फेडरेशन इतर समस्या सोडविण्याकरिता देखील असेच एकत्रितरीत्या प्रयत्न करणार असल्याचे फेडरेशनच्या वतीने मॅक न्यूज शी बोलताना सांगण्यात आले.

सदर मोहिमेच्या कामात फेडरेशन चे सदस्य रमेश रोकडे, अशोक नवल, विकास कामत, शकील सलाती, डी. डी. सिंग, मोरेश्वर बालवडकर, ॲड.परशुराम तारे, ॲड.डॉ. वसुंधरा पाटील, अमित खोत, सचिन सोमण, अंबारिष देशपांडे आणि ॲड. इंद्रजीत कुलकर्णी या सर्वांचा सहभाग आहे. तसेच सदर मोहिमेच्या कामात बालेवाडी येथील नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, डॉ. संतोष मुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

बालेवाडीतील सर्व रहिवाशांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध असुन त्यासाठी फेडरेशन चेअरमन रमेश रोकडे (९८२३९४२७७९) यांच्याशी संपर्क साधावा. ज्युपिटर हॉस्पिटल तर्फे रु ७८० मध्ये लस सोसायटी परिसरात लस उपलब्ध करून दिली आहे.

See also  सुस, म्हाळुंगे समाविष्ट गावांना दररोज दोन लक्ष लिटर पाणीपुरवठा टँकरने करणार : नगरसेवक अमोल बालवडकर