औंध आयटीआय येथील विलगिकरण केंद्र सुरू

0

औंध :

दिवसेंदिवस कारोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. नागरिकांची गैरसोय होत होती. औंध गाव व जवळ पास असणाऱ्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्यास जवळ पास कुटे विलगिकरण होण्याची सुविधा नसल्याने, नागरीक घरीच थांबत होते. त्यामुळे अधिकचा धोका निर्माण होतो म्हणून करोनाची पहिली लाट ओसरल्यावर बंद करण्यात आलेल्या सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.

औंध आयटीआय येथे मुलांच्या वसतिगृहामध्ये करण्यात आलेले विलगिकरण केंद्राचे उद्घाटन उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे, प्रल्हाद सायकर, ॲड. मुसळे, सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, सुशील लोणकर, मयुर मुंडे तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

औंध परिसरामध्ये औंध गावठाण परिसर व वस्ती परिसरामध्ये घरे लहान असल्यामुळे कोरोना विषाणूची बाधा झालेल्या नागरिकांची गैरसोय होत होती. छोट्याशा खोलीमध्ये रुग्ण बरोबरच घरच्या नातेवाईकांना देखील राहावे लागत होते. यामुळे घरातील नातेवाईकांना देखील कोरोना ची लागण होण्याचा धोका होता. परिसरातील वस्ती परिसर पाहता या परिसरामध्ये कोरोना रुग्णांसाठी विलगिकरण केंद्र उभे करणे गरजेचे होते. म्हणूनच नगरसेविका अर्चना मुसळे यांनी यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत तत्काळ औंध आयटीआय येथे बंद असलेले कोरोना विलगिकरण केंद्र सुरू करायचे ठरविले. अत्यंत कमी वेळामध्ये तीन ते चार दिवसांमध्ये हे केंद्र तयार करून या ठिकाणी चालू करण्यात आले. या ठिकाणी एकूण 120 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत तसेच इमर्जन्सी साठी ऑक्सीजन ची देखील या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.

सध्या येथे तीन डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत गरजेनुसार एकूण दहा डॉक्टर उपलब्ध करून देणार आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. या रुग्णांची औषधे व जेवणाची सोय पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे गावठाण व परिसरातील वस्तीमधील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे.

See also  बाणेर पिंपळेनिलख पुलाच्या कोनशिलेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख करण्याची आर पी आय ची मागणी.