करोना मुळे परराज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांमध्ये वाढ.

0

मुंबई:

मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या वाढतेय. वाढत्या रुग्णसंख्येमुळे परप्रांतीय धास्तावल्याचं चित्र आहे. त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांमध्ये वाढ झालीय.

मुंबईतल्या लांबपल्याच्या रेल्वेगाड्या सुटणाऱ्या स्थानकावर सगळे प्रवासी परराज्यातले आहेत,असे दिसते. विशेषतः उत्तर भारतात गावी जाणारे अधिक आहेत. कारण २०२० मध्ये कोरोनाचा मुंबईत शिरकाव झाल्यानंतर सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर मिळेल त्या मार्गाने, वाहनाने परप्रांतीय मजूर गावी जायला निघाले होते, काही चालत निघाले होते. आणि आता पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याच्या भीती आहे. त्यापूर्वी परप्रांतीय मजूर गावी जायला निघाले आहेत.

दररोज मुंबई रेल्वे स्थानकातून ६० टक्केच्या क्षमतेने गाड्या धावत आहेत. मुंबईच्या प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये दररोज ५० रेल्वे बाहेरच्या राज्यात जातात. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दररोज २० गाड्या इतर राज्यात जातात. सरासरी दररोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या २५ हजार असून यांपैकी फक्त मुंबईतून जाणाऱ्यांची संख्या १५ हजाराचा घरात पोचली आहे.

परप्रांतीय मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतात परप्रांतीय मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील वर्षाप्रमाणे स्थिती ओढवू नये म्हणून आधीच गावी पोहचण्यासाठी ही परप्रांतीय मजुरांची धडपड चालली आहे.

See also  महिलांना तालिबान देत असलेल्या वागणुकीबद्दल आणि अत्याचाराबद्दल जगभर पडसाद