औंध इंदिरा वसाहत व कस्तुरबा गांधी वसाहत येथील समस्या सोडविण्याची गायकवाड यांची मागणी.

0

औंध :

औंध जवळील गणेशखिंड इंदिरा वसाहत व कस्तुरबा गांधी वसाहत या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून नागरिक अनेक समस्यांनी ग्रासलेले आहेत. अस्वच्छ टॉयलेट, तुंबलेले ड्रेनेज, जीर्ण ड्रेनेज, पाण्याच्या निचरा न होणे, कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे.तसेच खराब झालेले रस्ते यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांच्या माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांच्याकडे तक्रारी येत होत्या. या समस्यांची पाहणी माजी नगरसेवक कैलास गायकवाड, युवक काँग्रेसच्या सरचिटणीस अदिती गायकवाड कडू पाटील यांनी स्थानिक नागरिक मदन मारुडा, शंकर गावडे, सुभाष सोनवणे, विजय अहिरे, विजय मोरे यांच्या सोबत केली असता, येथील व्यवस्था अतिशय वाईट होती. तुंबलेले ड्रेनेज त्यामुळे मच्छर चे प्रमाण वाढल्याने लोकांना डेंगू मलेरिया या सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या वेळी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस अदिती गायकवाड कडू पाटील यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, नागरीकांना अतिशय वाईट परिस्थिती ला सामोरे जावे लागते आहे. अगोदरच करोना मुळे नागरीक हैराण झाले आहेत, त्यात अस्वच्छतेमुळे येते रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे आणि नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी केली. अन्यथा नागरीकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी सहायक आयुक्तांना आव्हान केले की, सदर समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी. नागरिकांचे समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करून देखील या समस्येचे निराकरण केले जात नाही. सहाय्यक आयुक्त राऊत मॅडम सोबत चर्चा केली असता समस्येचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले आहे. ते पुर्ण न केल्यास नागरिकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी मॅक न्यूज शी बोलताना दिला.

 

 

See also  MNGL गॅस पाईप लाईनचे नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या हस्ते उद्घाटन : लवकरच औंध मध्ये सर्वत्र पाईप लाईन द्वारे घराघरात गॅस पुरवठा करणार