औंध :
परिहार चौकात बेकायदेशीर अनधिकृतितरित्या टाकण्यात आलेल्या टपऱ्यांबाबत वारंवार तक्रार करून ही कारवाई होत नसल्याने, अखेरीस माजी नगरसेविका अर्चना मुसळे व भाजपा प्रवक्ता अँड.मधुकर मुसळे व औंध येथील नागरिकांनी सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी महापालिका समोर आंदोलन केले. या आंदोलनात भ्रष्ट अधिकाऱ्यांची रावणाची प्रतिकृती ची गाढवावरून धिंड काढण्यात आली. याची दखल घेत पालिका प्रशासनाने मंगळवारी दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळीच ही कारवाई करून येथील रस्ता मोकळा केला.
परिहार चौक औंध येथे औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय व अतिक्रमण अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले व मा महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्या आदेशानूसार, परीहार चौक ते वेस्टेंड मॉल येथे नव्याने उभारण्यात आलेले ३१ टपऱ्यांवर वर कारवाई करण्यात आली.
सदर ठिकाणी काही दिवसांपूर्वी तेथील पथारी व्यावसायिकांनी आपले टपऱ्या काढून घेतले. व पुन्हा नव्याने सुमारे ३१ नवीन टपऱ्या उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी नागरिकांच्या वारंवार तक्रारी वाढत असल्याने अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली.
दि. १ ऑक्टोंबर रोजी पहाटे ५ वाजता सर्व यंत्रणा क्रेन -२, हायवा- ५, ब्रेकर -२, गॅस कटर -३, JCB -५, ओपन ट्रक -७, तसेच बिगारी १००, MSF, २०, पोलीस -२२ सहा. अतिक्रमण निरीक्षक -२२, अतिक्रण निरीक्षक ०४ व वरिष्ठ अधिकारी अतिक्रमण विभागाचे उप-आयुक्त सोमनाथ बनकर, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर स्थानिक सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर अधिकारी वर्ग उपस्थीत होते. विभागीय निरीक्षक श्री अवघडे, श्री साबळे, क्षेत्रीय निरीक्षक श्री नरूले, श्री जाधव, श्री तळेकर यांच्या नियंत्रणात कारवाई करण्यात आली. येथील सर्व स्टॉल अतिक्रमण विभागाने जप्त केले तसेच संपूर्ण रस्ता पदपथ मोकळा करण्यात आला.
आंदोलनानंतर आली महापालिका प्रशासनाला जाग आल्याची नागरिकांमध्ये चर्चा.