MNGL गॅस पाईप लाईनचे नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या हस्ते उद्घाटन : लवकरच औंध मध्ये सर्वत्र पाईप लाईन द्वारे घराघरात गॅस पुरवठा करणार

0

औंध :

सामान्य माणसाचे जीवन सुखमय होण्यासाठी अती आवश्यक असलेल्या सुविधा पैकी एक सुविधा म्हणजे घरगुती गॅस. परंतू तो मिळविण्या करीता खूप मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय अपघात झाल्यास गॅस सिलेंडर मुळे जीवाला देखील धोका निर्माण होतो.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्या मार्गदर्शनाखाली औंध व औंध ला लागून असलेला बाणेरचा भाग सिलेंडर मुक्त करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

औंध प्रभागातील भाजपा नगरसेविका अर्चना मुसळे आणि ॲड. मधूकर मुसळे यांच्या प्रयत्नातून औंध आयटीआय रोड वरील शिरीन गार्डन सोसायटी आणि सुपरकॉन रेसिडेन्सी मध्ये MNGL च्या माध्यमातून पाईप लाईन मधून गॅस प्रत्येक घरात पुरवठा करण्याच्या कामाचे उद्घाटन नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या हस्ते करून ह्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

याबद्दलची माहिती देताना ॲड. मुसळे यांनी सांगितले की, पाइपलाइनद्वारे गॅस मुळे गॅस वापरण्याच्या खर्चात 30 टक्के बचत होणार आहे त्याचबरोबर शहरातला सिलेंडरचा वापर कमी होऊन हे सिलेंडर ग्रामीण भाग व दऱ्याखोऱ्या मधील उज्वला गॅस योजनेद्वारे सर्व गोरगरीब नागरिकांना उपलब्ध करून देता येणार आहेत त्यामुळे अपघात होण्याची भीती नगण्य आहे 24तास सतत पुरवठा गॅस एजन्सी ला जाणारे कमिशन मध्ये बचत होऊन देशाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत गॅस सिलेंडर मुळे नागरिकांना होणारा मनस्ताप कायमचा दूर होणार आहे त्यामुळे आव्हान मध्ये प्रत्येक घरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.

औंध मधील बहुतेक सर्व सोसायट्यां च्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आम्ही दूर केलेली असून शिरीन गार्डन मध्येही लवकरच मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन ॲड मधुकर मुसळे यांनी यावेळी दिले.

नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले की, गॅस सिलेंडर म्हणजे प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो सुटणे अत्यंत गरजेचे होते. MNGL नॅचरल गॅस मुळे महिलेचा मनस्ताप कमी होणार असून जीवितास होणारा धोका संपणार आहे. MNGL च्या माध्यमातून पाईप लाईन ने गॅस पुरवठा हा अतिशय सुरक्षित असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

See also  योग्य नियोजनबद्ध कामामुळे योगीराज पतसंस्थेला नफा : ज्ञानेश्वर तापकीर

यावेळी नगरसेविका अर्चना मुसळे, ॲड. मधूकर मुसळे,  मोहन देशमुख, श्रीमती भौमिक, अर्जुन खानापुरे,
निशी टोग्नटा, गौतम घोष, केदार पाटणकर,मिसेस हालदीपूरकर, मयूर मुंढे, पुणे मनपा माजी आयुक्त रामनाथ झा, अनिल मदन, Mr खेतान, मॅनेजर चिंता, हिरामण ठोंबरे, अय्यर, माऊस्कर मॅडम , मिसेस लांबे मॅडम ,दादलानी मॅडम, संकेत सांगळे, इत्यादी उपस्थित होते.