नियम पाळले नाही तर पुन्हा लॉकडाऊन : मुख्यमंत्री

0

मुंबई :

कोरानाची ही लाट वाढू नये, शिखर पातळीवर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत, आपल्याकडे पुरेशी आरोग्य सुविधा आज तरी उपलब्ध आहे, त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांना मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करावेच लागेल, लस घेतली तरी ही त्रिसुत्री पाळावी लागेल, अन्यथा नाईलाजाने कडक निर्णय घ्यावे लागतील. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे मुख्यमंत्र्यांनी आज समाज माध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

राज्य लॉकडॉऊनच्या उंबरठ्यावर असतांना जिथे गर्दी होते तिथे कार्यालयांमध्ये, हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी नवीन बंधने घालावीच लागतील, येत्या काही दिवसात यासंबधीचे निर्णय होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच आवश्यकता असेल तर शासनाच्या परवानगीने लॉकडॉऊन लावण्याच्या सुचना आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुसऱ्या लाटेचा जगभरातील अनुभव फार वाईट आहे, ब्राझीलसारख्या देशात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे, तिकडे हाहाकार झाला आहे. तिथली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडत आहे. ती परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात अजिबात येऊ द्यायची नाही, आपल्याकडे पुन्हा लॉकडाऊन लागू द्यायचं नाही, त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त, त्रिसुत्रीचे पालन करून शासनाला सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

See also  मुंबईत 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे