औंध बोपोडी प्रभागात सुनील माने यांच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेचे शिबिर सुरू

0

पुणे :

सर्वसामान्यांच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार सदैव कार्यरत होते. सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार मात्र बिनाकामाचे आहे अशी टीका भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर यांनी केली.

भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने औंध – बोपोडी परिसरातील लोकांसाठी आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यासाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे तसेच शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगरसेवक व शहाराध्यक्ष योजना विभाग अजय खेडेकर, शिवाजीनगर मतदार संघाचे सरचिटणीस आनंद छाजेड, खडकी शिक्षण मंडळाचे सरचिटणीस गणेश नायकरे, पुणे शहर झोपडपट्टी आघाडी उपाध्यक्ष राजू पिल्ले, खडकी मंडळ अध्यक्ष धर्मेश शहा, खडकी युवा मोर्चा उपाध्यक्ष अजित पवार, अनिल भिसे, सुप्रीम चोंंधे, कैलास टोणपे, नितीन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

साळेगावकर म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर शेवटच्या घटका पर्यन्त सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मोदींचा चहावाल्या पासून प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत आहेत. राज्यात ही देवेंद्र फडणविसांचे सरकार होते त्यावेळी अनेक कल्याणकारी योजना आमच्या सरकारने आणल्या होत्या. सध्याचे सरकार मात्र सर्वसामान्यांसाठी काम करत नाही. ही शोकांतिका आहे.

सुनील माने म्हणाले, सर्वसामान्यांच्या सोयीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक योजना आणल्या आहेत. त्यापैकीच लोकांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्यमान भारत’ ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थांना पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा मोफत मिळणार आहे. यामध्ये पुण्यातील नामांकित रुग्णालयांच्या समावेश आहे. औंध – बोपोडी तसेच खडकी भागातील जवळपास १० हजार नागरिकांचा या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे. येत्या १ मार्च पर्यन्त हे शिबीर असणार आहे. पात्र नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

See also  औंध येथे महाविद्यालयाचे प्राचार्य यांची आत्महत्या !