सोमेश्वरवाडी उद्यानात लहान मुलांनी रंगवलेली विविध चित्रे. (PABBS FESTIVAL) 

0

औंध :

सोमेश्वरवाडी उद्यानात लहान मुलांनी रंगवलेली विविध चित्रे, कोरणा कालावधीनंतर प्रथम मोकळ्या वातावरणामध्ये चित्रकला स्पर्धेचा आनंद लहान मुलांनी घेतला. निमित्त होते माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे.

वाढदिवसानिमित्त PABBS FESTIVAL आयोजीत केला आहे. त्या अंतर्गत खास लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्या मध्ये मुलांनी विविध प्रकारचे रंग भरले. बऱ्याच दिवसानंतर मुलांना बाहेर मोकळ्या वातावरणात चित्र रंगवायची संधी मिळाली. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर अदभुत हास्य रंग पहायला मिळाले. हि छोटी बालके खूप खुश झाली. मुलांचा आनंद पाहून पालक देखिल आनंदी होते.

या छोट्या मुलांना आनंदी पाहून स्वतः सनी नीम्हण देखिल त्यांच्यामध्ये हरवून गेले. त्यांनी स्वतः जवळ जावून मुलांची आनंदाने संवाद साधला. या स्पर्धेच्या वेळी पालकांकडून उस्फूर्त प्रतिक्रिया आल्या, आणि सनी निम्हण यांचे आभार मानले. चित्रात रंग भरण्याचे काम या छोट्या चिमुकल्यांना दिल्याबद्दल त्यांच्या मध्ये वेगळा उत्साह होता. मुलांमध्ये उत्साह येण्यासाठी विदूषक आणि विविध कार्टून त्यांच्या अवतीभवती फिरत होते.

मुलान मधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करणे आवश्यक असते. कोरोना कालावधीमध्ये मुलांना या स्पर्धेपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे वाढदिवसाचे निमित्त साधून मुलांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी दिली.

सदर स्पर्धेचे आयोजन अजय काकडे, शिवम दळवी, विनय निम्हण, ऋषी निम्हण, अतुल काकडे, गोकुळ जाधव, विष्णू काकडे, अविनाश गायकवाड, अमोल जोरे, रोहित किरदत्त, अनिमेश दातार, निखिल आरगडे यांनी केले.

गट निहाय निकाल –

लहान गट :-

प्रथम क्रमांक :- कार्तिकी बिमानी

द्वितीय क्रमांक :- श्रेया कोठारी

तृतीय क्रमांक :- शर्वरी धिनेश

उत्तेजनार्थ प्रथम :- श्रेयश भोत

उत्तेजनार्थ द्वितीय :- राजश्री मुडावत

 

तिसरी ते चौथी :

प्रथम क्रमांक :- राधिका हांडे

See also  महाशक्ती असोसिएशन व एस एम एस ग्रुप तर्फे रस्त्यावरील गरजूंना अन्न वाटप. 

द्वितीय क्रमांक :- मायरा निम्हण

तृतीय क्रमांक :- श्रेयस काली

उत्तेजनार्थ प्रथम :- नम्रता फाटे

उत्तेजनार्थ द्वितीय :- सपना शिंदे

 

पाचवी ते सातवी

प्रथम क्रमांक :- सार्थक शिंदे

द्वितीय क्रमांक :- साक्षी पाखरे

तृतीय क्रमांक :- श्रावणी रेगे

उत्तेजनार्थ प्रथम :- सुनिता हसरमनी

उत्तेजनार्थ द्वितीय :-

नैतिक दामसे

आठवी ते दहावी :-

प्रथम क्रमांक :- रेणुका केसरगी

द्वितीय क्रमांक :- समीक्षा शेटे

तृतीय क्रमांक :- विवेक जाधव

उत्तेजनार्थ प्रथम :- शालिनी राजपूत

उत्तेजनार्थ द्वितीय :- समृद्धी चीतरवाल

उत्तेजनार्थ तृतीय :- वैष्णवी