औंध :
औंधगाव पुणे येथील ‘महाशक्ती’ जागतिक महिला लोकल्याण असोसिएशन तर्फे तसेच एस. एम .एस. ग्रुप च्या व आर.कोठारी यांच्या मदतीने कोरोना च्या लाॅकडाऊन च्या काळात १ में महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील पुणे शहरातील औंध ते शिवाजी नगर पर्यंत च्या रस्त्यावरील फुले, फुगे पिशव्या विकणारे तसेच दैनंदिन जीवनात रोजच्या हातावर पोट असलेल्या व आसरा नसणारे तसेच मुक्या प्राण्यांना अन्न वाटप करण्यात आले. अशा प्रकारे लाॅकडाऊन संपेपर्यंत वाटप करण्यात येणार आहे.
अशा दुर्लक्षित घटकांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपल्या परीने काहीतरी मदत मिळावी यासाठी १ में महाराष्ट्र दिनी अन्न वाटप करण्यात आले आहे, असे महाशक्ती असोसिएशन च्या अध्यक्षा विनया सराफ. एस एम एस ग्रुप चे अध्यक्ष सोनल सराफ. व सामाजिक कार्याला मदत करणारे आर. कोठारी हयांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितलेआहे. ही मदत तात्पुरती नसून लाॅकडाऊन संपेपर्यंत करण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले.
पुढे ते म्हणाले की अशा दुर्लक्षित लोकांना कठीण परिस्थितीमध्ये आधार मिळणे गरजेचे आहे. या लॉकडाउनच्या काळामध्ये उपासमारीने त्यांना जीव गमावण्याची वेळ येऊ नये म्हणून राज्य सरकारने याबाबत काहीतरी योजना राबविणे गरजेचे आहे. ज्यांना जमेल त्यांनी अशा लोकांना व मुक्या प्राण्यांना मदत करावी असे आव्हान देखिल त्यांनी केले.