बाणेर येथील आदित्य इंग्लिश मिडियम स्कूल, 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा…

0

बाणेर :

बाणेर, पुणे येथील भैरवनाथ, शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मिडियम स्कूल, येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 7:30 वाजता झाली. स्वातंत्र दिनानिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  जयेश मुरकुटे यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक शिवलाल धनकुडे, सेक्रेटरी विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकुडे,अध्यक्षा सुरेखा धनकुडे, सी.ई ओ. सुषमा भोसले, मुख्याध्यापिका रेखा काळे, कोमल शिंदे हे सर्वजण उपस्थित होते.

तसेच प्रणाली धनकुडे, कोमल धनकुडे, काळूराम सायकर,  वैजयंती मुरकुटे, हनुमंत मुरकुटे, प्रतिक मुरकुटे, माजी सरपंच सिद्धार्थ रणवरे, अॅड संकेत बुंदेले, अॅड उदय शेलार याबरोबरच संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालक इत्यादिंनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

स्वातंत्र्यदिना निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आंनदाने सहभाग होऊन, विविध कार्यक्रम सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.  राहुल धनकुडे सर यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे तसेच उपस्थित असलेल्या सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाणिज्य शाखेच्या विद‌यार्थीनींनी केले.

See also  सचिन दळवी सामाजिक सेवेतून चांगले उपक्रम राबवितात : चित्रा वाघ