सचिन दळवी सामाजिक सेवेतून चांगले उपक्रम राबवितात : चित्रा वाघ

0

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे भाजपा युवा नेते सचिन दळवी आणि लक्ष्मी सचिन दळवी यांच्या वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १४ सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या शुभहस्ते सुकन्या समृध्दी योजना अंतर्गत पासबुक वाटप तसेच गरजु विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वह्या आणि पॅड वाटप करण्यात आले.

यावेळी प्रास्तविक करताना सचिन दळवी यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांची विविध उपक्रमातून सेवा करण्याच्या हेतूने एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आमचे मार्गदर्शक आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमातून करत आहे.

यावेळी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, सामाजिक सेवेतून विविध कार्यक्रमातून आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस राज्यभर साजरा होत असताना सचिन दळवी यांनी लहान मुलींसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेला कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. लहान मुलींसाठी भविष्याचा विचार करून सुकन्या समृध्दी योजना अंतर्गत बँक पासबुक काढून देत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी शालेय साहित्य वाटप करत आहे असे विविध चांगले उपक्रम सतत सचिन राबवत असतो त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादांना लहान मुलांनी दिलेल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवणार आहे.

यावेळी मंदार घुले, स्विकृत नगरसेवक शिवम सुतार, पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, रोहन कोकाटे, सुनिता निजामपुरकर, हभप बारिकराव जोरे, जगन्नाथ दळवी, उत्तम जाधव, धनंजय बामगुडे, सोमेश्वरवाडीतील सर्व ग्रामस्थ व मित्र परिवार उपस्थित होते.

See also  म्हाळुंगे येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन भाजपच्या वतीने संपन्न.