पीएमपीएमएल ची संपूर्ण माहिती मिळणार केवळ एका टच वर, “आपली पीएमपीएमएल” ॲप होणार लॉन्च..

0

पुणे :

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या “आपली पीएमपीएमएल” या मोबाईल ॲप चे उद्या (दि.15) उद्घाटन स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रवाशांच्या सेवेत “आपली पीएमपीएमएल” हे मोबाईल ॲप दि.17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

सदरचे मोबाईल ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर “Apli PMPML” या नावाने उपलब्ध असून अँड्रॉइड मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येईल.

*आपली पीएमपीएमएल” या मोबाईल ॲप ची ठळक वैशिष्ट्ये पुढीप्रमाणेः-*

*सर्व बसमार्गांची माहिती समजणारः* –

प्रवाशांना त्यांच्या करंट लोकेशन वरून इच्छित स्थळी जाणेसाठी आवश्यक असलेल्या बसमार्गाची माहिती मोबाईल ॲप वर समजणार.

*बसचे लाईव्ह ट्रॅकिंग होणारः-*

मोबाईल ॲप मधून बसचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना दिसणार आहे. यामुळे बस थांब्यावर किती वेळात येणार हे देखील समजणे शक्य होणार आहे.

*ऑनलाईन तिकीट काढता येणारः* –

सदर मोबाईल ॲप वरून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट युपीआय द्वारे बुक करता येईल.

*दैनंदिन पास देखील काढता येणारः* –

सदर मोबाईल ॲप वरून प्रवाशांना रू. 40, रू.50 व रू. 120 चे दैनंदिन पास काढता येणार आहेत.

*तक्रार नोंदविता येणारः-*

सदर मोबाईल ॲप वरून प्रवाशांना त्यांच्या तक्रारी देखील नोंदविता येणार आहेत.

“ *आपली पीएमपीएमएल” मोबाईल ॲप वरून मेट्रो तिकीट देखील काढता येणारः-*

“आपली पीएमपीएमएल” मोबाईल ॲप वरून प्रवाशांना मेट्रो चे तिकीट देखील काढता येणार आहे.

तरी जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी “Apli PMPML” या मोबाईल ॲप चा वापर करावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करणेत येत आहे.

तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परिवहन महामंडळाच्या गुणवंत कामगार व अधिकाऱ्यांचा सत्कार देखील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करणेत येणार येणार आहे.

See also  कसाब्याचे किंगमेकर भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही प्रचारासाठी मैदानात...