राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर

0

मुंबई :

चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर झाले आहेत. याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2023 जेष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2023 जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर झाले आहेत.

या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन करत राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे, अशा शुभेच्छा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

सन 2020 सालच्या 58 व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट, कडूगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ठ चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन घोषित केली. तसेच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरीता जून, जयंती, फनरल या तीन चित्रपटांची नामांकने घोषित केली आहेत.

सन 2021 सालाच्या 59 व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं, एकदा काय झालं, गोदावरी, फ्रेम, कारखानिंसांची वारी, इरगल, येरे येरे पावसा, बाल भारती, राख, बाईपण भारी देवा या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकने जाहीर झाली असून प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननी, लकडाऊन बी पॉझीटिव्ह, आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणं, फ्रेम, कुलूप या तीन चित्रपटांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे.

See also  महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे