पिंपरी चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात आत्तापर्यंत 67 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. 8 जणांना चिकुनगुनिया, तर 5 जणांना झिकाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये 3 गर्भवती महिलांचा समावेश आहे.
शहरात सध्य:स्थितीत 67 जणांना डेंग्यू, 8 जणांना चिकुनगुनिया, तर 5 जणांना झिकाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये 3 गर्भवती महिलांचा समावेश आहे. या तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिलांना झिका व डेंग्यु या आजाराची ताप, सांधेदुखी, डोळयांच्या मागे दुखणे आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.