विद्यांचल हायस्कुलमध्ये स्वातंत्र्यदिन संपन्न…

0

बाणेर :

विद्यांचल हायस्कूलच्या प्रांगणात ७८ वा स्वातंत्रदिन इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्थानी एकत्रीतपणे साजरा केला.

यावेळी प्रमुख पाहुणे सैनिक दीपक बर्मन , योगीराज
नागरी पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर तापकीर, रोटरी क्लब चे सदस्य राजेंद्र शेलार, सुखानंद जोशी, ए. सी. एम. ए. चे समुपदेशक सचिन मोरालवार, इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेले मेजर आकाश पवार तसेच अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अशोक मुरकुटे, संस्थेचे माननीय सदस्य भालचंद्र मुरकुटे , श्वेता मुरकुटे , योगिता बहिरट, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनीषा कुलकर्णी व मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका दिपाली महाजन, संगीता डेरे, सुनंदा धोत्रे तसेच उपमुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजगीत सादर करून , देशप्रेम व्यक्त करणाऱ्या घोषणा विद्यार्थ्थानी दिल्या, कारगील विजय दिवस व कारगिल युद्धातील जवानांची शौर्यगाथा’, यावर आधारित भाषणे व समूहगीत, विद्यार्थ्यांकडून सादर केले गेले. अशा विविध कार्यक्रमांचे अतिशय उत्साहात व जल्लोषात सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्वेता रणदिवे यांनी केले.

See also  लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे नित्य पुण्यपर्ण उपक्रमास सुरुवात.