घाबरू नका…काळजी घ्या! पुण्यात आढळला ‘झिका’चा चौथा रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर

0

पुणे :

कोरोना महामारीतून आता कुठे जग सावरलं आहे. मात्र पुण्यात सापडलेल्या झिका व्हायरसने राज्यासर देशाचं टेन्शन वाढवलं आहे. पुण्यात आज चौथा रुग्ण आढळला आहे. झिकाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली.

ज्या भागात चार रुग्ण सापडले आहेत त्या भागात सर्वेक्षण सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. रक्त नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत. त्याच्या अहवालांची प्रतिक्षा आहे, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, उपचार वेळेत घेतले तर झिका बरा होऊ शकतो. खासगी रुग्णालयांनीही माहिती लपवू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

See also  मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान महापालिका क्षेत्रात राबविणार