मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान महापालिका क्षेत्रात राबविणार

0
slider_4552

पुणे :

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राज्यात राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यासह पुणे महानगरपालिका क्षेत्रातही हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालाधीत राबविण्यात येत आहे.

ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. ना कोणाच्या पुढे जाण्याची इच्छा असावी. पण स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मात्र प्रत्येक विद्यार्थ्याप्रती असावी, अशी जिद्द प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात निर्माण व्हावी शाळेमध्ये निकोप स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे.

शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीचे आनंददायी व प्रेरणात्मक वातावरण मिळावे, यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले आहे.

या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना 1 लाखापासून ते 51 लाखापर्यंत बक्षीस देण्यात येणार आहेत. त्यात वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रात शाळांना प्रथम क्रमांकासाठी २१ लाख, द्वितीयसाठी 11लाख, तर तृतीयसाठी 7 लाख रुपये अशी एकूण 39 लाखांची पारितोषिक दिली जातील. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनाच्या शाळांना अनुज्ञेय असेल.

मुल्यांकनासाठी समिती

शाळांना अभियानात भाग घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारात 100 गुण देण्यात येणार आहेत. वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यापैकी सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्र पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी निवड करण्यात मूल्यांकन समिती असेल. संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक हे अध्यक्ष असतील. संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त यांनी नामनिर्देशित केलेल्या प्रतिनिधी गट अ संवर्गातील अधिकारी हे सदस्य असतील. संबंधित शिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव असतील.

*अभियानाचे उद्दिष्ट काय?*

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक याच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हे अभियानाचे उदिष्ट आहे.

सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व महानगरपालिका शाळांना आवाहन करण्यात येत आहे की, पोर्टल वर आपण नोंदणी करून अभियानात सहभागी व्हावे व 30 नोव्हेंबर23 च्या शासन निर्णयानुसार पूर्वतयारी करून अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेच्या सुनंदा वाखारे यांनी केले आहे.

See also  विद्यार्थांनी घेतले नविन वर्षासाठी आजी आजोबांचे अर्शिवाद.