पुणे-कोल्हापूर, पुणे-हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू

0

पुणे :

मध्य रेल्वे कडून पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गाड्या आठवड्यातून तीन दिवस असणार आहेत.

*पुणे-कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)*

गाडी क्रमांक 20674 पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) 18 सप्टेंबर पासून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पुण्याहून दुपारी 02.15 वाजता निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 07.40 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक 20673 कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) 19 सप्टेंबर पासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी कोल्हापूरहून सकाळी 08.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पुण्यात दुपारी 01.30 वाजता पोहोचेल

ही गाडी सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज या स्थानकावर थांबेल. आठ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस असेल.

*पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)*

गाडी क्रमांक 20670 पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस (त्रि-साप्ताहिक) 19 सप्टेंबर पासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी दुपारी 02.15 वाजता पुण्याहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री 10.45 वाजता हुबळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक 20669 हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस (त्रि-साप्ताहिक) 18 सप्टेंबर पासून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 05.00 वाजता हुबळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी पुण्याला दुपारी 01.30 वाजता पोहोचेल.

ही गाडी सातारा, सांगली, मिरज, बेळगावी आणि धारवाड या स्थानकावर थांबेल. आठ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस असेल.

See also  घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी सुमारे साडेतीन कोटी खर्च, महापालिकेच्या प्रत्येक विभागाला १२ लाख रुपये निधी देणार