नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी देशाची राजधानी ‘हाय अलर्ट’ वर, दिल्लीत ‘या’ गोष्टींवर बंदी

0

दिल्ली :

देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये NDA ला जास्त बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकार स्थापन करणार आहे. शुक्रवारी एनडीएच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली. आता लवकरच मोदी सरकारचा शपथविधी दिल्लीत पार पडणार आहे.

त्यासाठी, दिल्लीत मोदी सरकारच्या शपथविधीची तयारी जोरात सुरू झाली आहे. उद्या म्हणजेच रविवारी (१ जून) नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या अनुषंगाने देशांच्या राजधानीत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीला सध्या नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आले आहे

तसेच, ड्रोन उडवण्यास आणि पॅराग्लायडिंग करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे आज आणि उद्या (१० जून) दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. यासोबतच राष्ट्रपती भवनाची सुरक्षाव्यवस्था देखील कड़क करण्यात आली आहे

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खास राष्ट्रपती भवनासाठी निमलष्करी दलाच्या ५ तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर तैनात केले जातील. या व्यतिरिक्त दिल्ली शहरातील लीला, ताज, आयटीसी मौर्य, क्लेरिजेस आणि ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेल्सना यापूर्वीच कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

*मोदी सरकारच्या शपथविधीला ‘या’ देशांचे नेते उपस्थित राहू शकतात*

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताने बांग्लादेशच्या पतप्रधान शेख हसीना, मालदिवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशिअमचे पंतप्रधान प्रविद जुगनाथ आणि सेशेल्सचे पंतप्रधान वावेल रामखेलावन इत्यादी महत्वपूर्ण व्यक्तीना आमंत्रित केले आहे.

या सगळ्यांसोबतच नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दहल ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत

*राष्ट्रीय राजधानीत हाय अलर्ट, ३ थरांची कडक सुरक्षा*

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या संदर्भात बोलताना काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सोहळ्यासाठी दक्षिण आशियाई असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशनच्या सदस्य देशांतील मान्यवरांना आमंत्रित केल्यामुळे राष्ट्रीय राजधानी हाय अलर्टवर असेल.

See also  राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय ? त्या संबंधित निर्णय कोण घेते

या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्वाच्या ठिकाणी दिल्ली पोलिसांचे SWAT आणि NSG कमांडो तैनात असतील, तसेच, शपथविधीसाठी दिल्लीत आजपासून त्रिस्तरीय (तीन स्तर) सुरक्षाव्यवस्था असेल.