सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार : राधाकृष्ण विखे-पाटील

0

अहमदनगर :

सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे. राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे.

सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते आज झाले.यावेळी विखे-पाटील बोलत होते.

यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे,जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,नायगांवचे सरपंच राजाराम राशीनकर,दीपक पठारे आदी उपस्थित होते.

See also  भारताला 2027 पर्यत कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी प्रयत्न सुरू : नितीन गडकरी