महिला टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने मिळविला उपांत्य फेरीत प्रवेश..

0

दक्षिण आफ्रिका :

दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाने आपला अखेरचा साखळी सामना आयर्लंडविरुद्ध खेळला. पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण न होऊ शकलेल्या या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 भावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत जागा पटकावली.

आपला 150 वा सामना खेळत असलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय सलामीवीर शफाली वर्मा व स्मृती मंधाना यांनी योग्य ठरवला. दोघींनी 9.2 षटकात 62 धावांची सलामी दिली. शफाली 24 धावांवर बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौर फलंदाजीला उतरली. मात्र, ती 13 धावाच करू शकली. असे असताना स्मृतीने एक बाजू लावून धरत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. बाद होण्यापूर्वी तिने 56 चेंडूवर 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जने 19 धावांची खेळी करत संघाला 155 पर्यंत पोहोचवले.

स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी उतरलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात खराब झाली. एमी हंटर पहिल्याच चेंडूवर धावबाद होत परतली. तर, रेणुकाने ओर्लाचा त्रिफळा उडवला. मात्र, त्यानंतर लॉरा डेलानी व गॅबी लुईस यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत या दोघींनी संघाला 8.2 षटकात 54 पर्यंत मजल मारून दिली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा आयर्लंड डकवर्थ-लुईस नियमानुसार पाच धावांनी मागे होता. अखेर पुन्हा खेळ सुरू झाल्याने भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले. स्मृती मंधाना हिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

See also  अंतर्गत भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त : संदिप भोंडवे