गणेशखिंड येथिल मॉडर्न कॉलेज मधे ‘वहातुक नियमन’ या विषयावर मार्गदर्शन..

0

गणेशखिंड :

गणेशखिंड येथिल मॉडर्न कॉलेज मधे ‘वहातुक नियमन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजन व पुणे वाहतूक विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना पोलीस अधिक्षक विश्वास आव्हाड म्हणाले,” राईट ईज आँलवेज राईट. रस्त्यावर चालताना नेहमी उजव्या बाजूने चालले पाहिजे. शार्ट कट अजिबात घेऊ नका. हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. सीट बेल्ट जीवनाच्या रक्षणासाठी आहे. मेट्रो विद्यापीठ चौकातून जाणार आहे व त्याचे काम बरेच दिवस चालेल त्यामुळे विद्यापीठ चौक रस्त्याएवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा. त्यांनी याबरोबरच रहदारीच्या नियमांबद्दल अनेक माहितीपूर्ण गोष्टी सांगितल्या आणि मेट्रोसंदर्भात विद्यापीठाजवळ सुरू असलेल्या कामाची माहितीही त्यांनी दिली.”

प्रत्येक विद्यार्थी वाहतूक नियमांचे पालन करेल आणि मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांबाबत समस्या सोडवण्यास मदत करेल.महाविद्यालायातर्फे पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी दिले.

आरजे अक्षयचा विद्यार्थ्यांशी चांगला आणि मनोरंजक संवाद झाला आणि त्याने त्यांना नृत्य सादर करायला लाऊन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून दिले.

या प्रसंगी पोलीस सब इन्स्पेक्टर श्री वसंत देसाई पोलीस काॅन्सटेबल श्री देवीदास पाटील, लेडीज पोलीस काॅन्सटेबल अश्वीनी सरद, पोलीस नाईक विशाल आव्हाड आणि Rj अक्षय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत डॉ.मंजुषा कुलकर्णी मॅडम यांनी केले इतर सदस्य उपस्थित होते प्राचार्य डॉ.संजय खरात, उपप्राचार्या शुभांगी जोशी मॅडम, गगनग्रास मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा कुमोद सपकाळ सर, प्रा.गोविंद कांबळे, डॉ. मंजुषा कुलकर्णी मॅडम व अनेक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

See also  मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे बँकिंग स्किल डेव्हलपमेंट कोर्स उत्साहात पूर्ण.