कै. मारुती महादू सुतार विद्यालय सुतारवाडी, पाषाण येथे मराठी भाषा पंधरवाडा निमित्त व्याख्यान संपन्न

0

सुतारवाडी :

कै. मारुती महादू सुतार विद्यालय सुतारवाडी पाषाण येथे मराठी भाषा पंधरवाडा निमित्त व्याख्यान आयोजित केले होते. माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी यावेळी उपस्थित राहून व्याख्यानाचा आनंद घेत विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.

यावेळी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधताना शिवम सुतार म्हणाले की, कवी हा एकमेव व्यक्ति आहे जो पूर्ण जगाच दुःख स्वताच्या मनामधे साचुन ठेवतो आणि, कवितेच्या माध्यमातून सर्वांसमोर आणतो. कविता आपल्या मनातील भावना व्यक्त होण्यास मदत करते. आपणास आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहेच पण सोबत आपण मराठी साहित्य आत्मसात केली पाहिजे.

सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना आंधळे यांनी मराठी कवितेची समृद्ध परंपरा या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन केले. या वेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.वि.दा.पिंगळे जी, मुख्याध्यापक श्री.शिवाजी ताम्हणे सर, शिक्षक श्री.प्रकाश बर्वे सर, श्री.संदीप भालेराव सर, सौ.कविताताई पाटील मॅडम, विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  वसुंधरा अभियान बाणेर चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा