बाणेर :
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. दिवसेंदिवस कसबा मतदार संघात प्रचार शिंगेला पोचला असुन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार करण्यासाठी बाणेर बालेवाडी येथील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी देखिल घरोघरी जाऊन प्रचारात सहभाग घेतला आहे. या पोट निवणुकित एक एक मतदार महत्वाचा आहे.
याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मतदार बंधु भगिनींना आव्हान केले आहे की, दिनांक २६ फेब्रुवारी ’23* रोजी कसबा मतदार संघात विधानसभा पोट निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने सध्या बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सुस, महाळुंगे येथे वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना आम्ही विनंती करीत आहोत की, जर आपले नाव कसबा मतदार यादीत समाविष्ट असेल तर कृपया आम्ही सोबत एक लिंक पाठवत आहोत, ती ओपन करून त्या मध्ये आपली सर्व माहिती भरून त्वरीत सबमीट करावी ही विनंती.
Link:-https://forms.gle/Pf4C7GEJkp6GcjHz8