योगीराज पतसंस्थेच्या वतीने स्टाफला दुचाकी वाहनाचे वाटप

0
योगीराज नागरी पतसंस्थेच्या वतीने दुचाकी भेट देताना चे छायाचित्र

पुणे: औंध प्रतिनिधी:-

योगीराज पतसंस्थेच्या वतीने संस्थेच्या 5 स्टाफला नगरसेविका सायली वांजळे, माजी आयकर अधिकारी सुनिल लोहिया व गुडविल इंडिया चे कालिदास मोरे यांच्या हस्ते दुचाकी वाटप करण्यात आल्या.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेतील स्टाफ ने कोरोनाच्या काळात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल यावर्षी पासून प्रत्येक स्टाफला 50 हजार रुपये दिवाळी अँडव्हान्स देण्यात आला. त्या अँडव्हान्सचा स्टाफने दुचाकी घेण्यासाठी वापर केला आहे. तसेच या निमित्ताने एका स्टाफने संस्थेत 12 लाख रुपयांची ठेव ठेवली.

दुचाकी वाहनांना विशेष डिस्काउंट दिल्याबद्दल कळमकर टीव्हीएस शोरूमचे योगेश कळमकर यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. कालिदास मोरे आणि सुनिल लोहिया यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला व स्टाफचे अभिनंदन केले.

याप्रसंगी माजी सरपंच अंकुशराव बालवडकर, हॉटेल व्यवसायिक अनिलशेठ काटे, उद्योजक मनोज तापकीर, कुलजीत टोकस, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, सहयोगी संचालक राहुल मुरकुटे, शाखा व्यवस्थापीका सिमा डोके व सर्व स्टाफ उपस्थित होते. आलेल्या सर्वांचे स्वागत नियोजन समिती अध्यक्ष राजेश विधाते यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी मानले.

See also  औंध ब्रेमन चौकातील ट्राफिक पार्क चे उद्घाटन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते.