क्रिकेट महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

दक्षिण आफ्रिका:

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी धडक मारली आहे. शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सरस धावगतीच्या जोरावर सुपर सिक्स‌ फेरीतून सरस धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरी जागा मिळवली.

सुपर सिक्सच्या ब गटातून भारतासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीचा प्रवास केला.

भारताच्या वरिष्ठ संघाची सलामीवीर असलेल्या शफाली वर्मा तिच्याकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. दणदणीत कामगिरी करत तिन्ही सामन्यात विजय मिळवले. त्यानंतर सुपर सिक्स फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागलेले. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मात्र भारताने मोठा विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ उत्कृष्ट धावगतीच्या बाबतीत पहिल्य स्थानी पोहोचला.

दुसरीकडे सुपर सिक्स फेरीच्या अ गटातून न्यूझीलंड व यांनी उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले.‌ 27 जानेवारी रोजी दोन्ही उपांत्य फेरीचे सामने खेळवले जातील. पहिल्या सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. तर, दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगेल. पहिल्यांदा खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी खेळला जाईल.

 

See also  २०२१ चा वर्ल्ड गेम्स ऍथलीट पुरस्कार मिळवत गोलरक्षक पीआर श्रीजेशने रचला इतिहास. भारतातील पहिलाच पुरुष हॉकीपटू..