भारताच्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा वाढल्या..

0

मीरपूर :

बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना ढाकामध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने थरारक विजय मिळवला.

यामुळे भारताच्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा आणखी बळकट झाल्या आहेत. या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर कायम आहे, तर दक्षिण आफ्रिका भारताला प्रभावी ठरू शकतो.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी जेव्हा 145 धावांचे लक्ष्य होते, तेव्हा आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कौतुकास्पद खेळी केली. ज्यामुळे भारताने शेर ए बांगला स्टेडियमवरील सामना जिंकत मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिका विजयाबरोबरच भारतासाठी सलग दुसऱ्यांदा कसोटी चॅम्पियनशीपची अंतिम फेरी गाठण्याची संधी निर्माण झाली.

या स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 76.92 टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांना घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन आणि भारतात भारताविरुद्ध चार कसोटी सामने खेळायचे बाकी आहेत. यामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला प्रथमच कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळता येणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर भारताची टक्केवारी 58.93 झाली आहे. आता भारताला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची बाकी आहेत. या मालिकेत भारताला चांगला निकाल द्यावा लागणार आहे. जेणेकरून संघाला अंतिम फेरीत सहज जाता येईल. कारण तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघालाही अंतिम फेरीत जाता येणार आहे. भारत पहिल्या कसोटी चॅम्पियनशीपमध्येही पोहोचला होता. तेव्हा अंतिम फेरीत संघाला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले होते.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर मालिका फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. या मालिकेत चार कसोटी सामने खेळले जातात. या मालिकेत भारत 4-0 असा जिंकला, तर भारताचे कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहोचणे निश्चित होईल.

तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. त्यांची टक्केवारी 54.55 आहे. त्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन आणि वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर दोन हे सामने खेळायचे बाकी आहेत. त्यांनाही शेवटच्या फेरीत जाण्याची संधी आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध उरलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल. तर फेब्रुवारी-मार्चमध्ये घरच्या मैदानावर त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत विजय मिळवत टक्केवारी वाढवता येईल.

See also  भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटची सुवर्ण पदकाला गवसणी.