अबब… चौदा अब्ज रुपये किमतीची चांदी समुद्रात बुडालेल्या जहाजातून काढण्यात आली.

0

 

मॅकन्युज :

भारतातून इंग्लडंला जवळपास १४ अब्ज रुपये किंमतीची चांदी घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले होते. जवळपास ७० वर्षानंतर या समुद्रातून चांदी काढण्यात यश मिळाले आहे.

इंग्रज येण्यापूर्वी भारतात ‘सोन्याचा धूर’ निघत होता असे म्हटले जात होते. इंग्रजांनी भारताची लूट करत ब्रिटनची तिजोरी भरली. ही लूट किती असेल याचा अंदाज यावा अशी एक घटना समोर आली आहे. पुरात्व खात्याच्या तज्ज्ञांना २०११ मध्ये जलसमाधी घेतलेल्या एमएस गॅरसोप्पा जहाज सापडले होते. या जहाजातून १४ अब्ज रुपयांची चांदी काढण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एसएस गॅरसोप्पा जहाजातून कोलकातामधून ब्रिटनला चांदी नेण्यात येत होती. या चांदीचा वापर दुसऱ्या महायुद्धा दरम्यान करण्यात येणार होता.

या खजिन्याबाबत डेली एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातून चांदी घेऊन हे जहाज आयर्लंडला जात होते. या प्रवासात जहाजाचे इंधन संपले होते. त्याच वेळेस जर्मन यु बोटने या जहाजावर हल्ला केला. हल्ल्यानंतर जहाजाला जलसमाधी मिळाली. त्यावेळी जहाजावर असलेल्या ८५ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर हा खजिना समुद्रात लुप्त झाला होता.

वर्ष २०११ मध्ये या जहाजाचा शोध घेण्यात यश आले. सध्याच्या बाजारभावानुसार याची किंमत १४ अब्ज रुपये आहे. या चांदीचा शोध घेणाऱ्या ओडसी मरीन ग्रुपने सांगितले आतापर्यंत जवळपास ९९ टक्के चांदी काढण्यात आली आहे. या दलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग स्टेम यांनी यांनी सांगितले की ही शोध मोहीम अतिशय आव्हानात्मक होती. ही चांदी एका लहानशा कंपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी पोहचणे अतिशय कठीण काम होते.

See also  धक्कादायक ! जंगलाचा राजा सिंह देखील कोरोना पॉझिटिव्ह.