पेट्रोल ५ रुपयाने स्वस्त होणार ?

0

नवी दिल्ली :

कोरोनाच्या संकटात पेट्रोल- डिझेलच्या उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा विचार सुरू झाल्याने पेट्रोल प्रति लिटर 5 रुपयांनी स्वस्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशातील इंधन कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविण्याचा सपाटा लावला होता.

गेल्या २९ दिवसांपासून इंधन दर स्थिर ठेवणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली होती. पेट्रोल २६ पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी वाढले होते. मात्र, आज, शुक्रवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे रेकॉर्ड स्तरावर पोहोचलेल्या इंधनाच्या किंमतीपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी शक्यता दिसून येत आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चांकी पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा देण्याची शिफारस केली आहे. उत्पादन शुल्क कमी करुन सामान्यांना दिसाला देऊ शकतो, असे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाच्या मते, कोरोना संकट काळात पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादन शुल्कात ५० टक्क्याने कपात केली तर पेट्रोल दर कमी होतील. ५० टक्क्याप्रमाणे पेट्रोलचे दर ५ रुपयांपर्यंत प्रति लिटरमागे कमी होऊ शकतात. लॉकडाऊन काळात सरकारने पेट्रोलवर एकरकमी १० रुपये उत्पादन शुल्क वाढविले होते. तसेच, उत्पादन शुल्कात कपात केली गेली तर ग्राहकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यांना देखील सहकार्य करावे लागेल.

जाणून घ्या आजचे दर

दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये आणि डिझेल 74.38 रुपये लीटर

मुंबई- पेट्रोलचे दर 90.83 रुपये आणि डिझेल 81.07 रुपये लीटर

कोलकाता- पेट्रोल 85.68 रुपये आणि डिझेल 77.97 रुपये लीटर

चेन्नई- पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझेल दर 79.72 रुपये लीटर

बेंगळुरु- पेट्रोल 87.04 रुपये आणि डिझेल 78.87 रुपये लीटर

 

See also  बीएसएनएल ला मजबूत करण्यासाठी सरकारचे आश्वासक पाऊल