पुणे बार असोसिएशन तर्फे व्याख्यानाचे आयोजन…

0

शिवाजीनगर  :

पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन तर्फे दिनांक २१/०९/२०२२ रोजी जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल येथे  डॉ. उल्हास फडके सर यांचे ‘भारतीय इतिहासातील बलस्थाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ. फडके यांनी भारतीय इतिहास उलगडुन सांगत असताना उपेक्षित राहिलेल्या घटनांकडे  लक्ष वेधले. डॉ. फडके म्हणाले की, इतिहासात बऱ्याच घटना व खूप लोक हे उपेक्षित राहिलेत. जे आपले आहे त्या गोष्टींचा अभिमान आपण बाळगायला हवा. आजवर अनेक कर्तृत्ववान लोक या भूमीत होऊन गेले परंतु, त्यांच्या कर्तृत्वाची दखल आपण घेतली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कालांतराने आपल्याला त्यांच्या कार्याचा विसर पडतो.. ऐतिहासिक वारसा व ठेवा हा महत्वाचा असून राष्ट्र उभारणीसाठी आपण तो जोपासला पाहिजे. असे ते म्हणाले.

तसेच याप्रसंगी बोलताना पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख साहेब हे म्हणाले की, वकीलांसाठी बार मध्ये असे व्याख्यानाचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांची मते आपण जाणून घेतली पाहिजे व या बौद्धिकांच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

याप्रसंगी पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांनी, आपल्या देशाला एक समृद्ध इतिहास आहे. नाविन्याची कास धरत असताना आपण आपले मूळ विसरता कामा नये. आपली सुरवात विसरता काम नये, आपल्या महापुरुषांनी व स्वातंत्र्य सेनानींनी केलेले कार्य सदैव स्मरणात ठेवून आपण कृती केली पाहीजे. असे मत व्यक्त केले.

तसेच यांप्रसंगी विविध पदांवर निवड झालेल्या वकीलांचा सत्कार पुणे बार असोसिएशनतर्फे करण्यात आला. यामध्ये ऍड. अशोक पलांडे, ऍड. शिरीष शिंदे, ऍड. मनोज काळे, ऍड. चंद्रशेखर गायकवाड, ऍड. जयश्री बिडकर, ऍड. मोनिका वाडकर, ऍड. ऊर्मिला जाधव, इ. वकिलांचा सहभाग आहे तसेच तसेच ‘लॉ सी.ई.टी’ मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. गार्गी अमर लांडगे या विद्यार्थीनीचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य ॲड. रितेश पाटील यांनी केले तर आभार ऍड. अमोल दुरकर यांनी मानले.
याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ॲड. अमोल शितोळे, सचिव ॲड. सुरेखा भोसले खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ऍड. सई देशमुख, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले,  ॲड.तेजस दंडागव्हाळ तसेच मोठ्या संख्येने वकील बांधव व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

See also  ॲड. मधुकर मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त औंध आयटीआय येथे वृक्षारोपण...