“रानभाजीचा नैसर्गिक व जैविक वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणे व त्याचे जतन हे महत्वाचे ” : रवी वानखेडे

0

गणेशखिंड :

गणेशखिंड माॅडर्न महाविद्यालयात निसर्ग सेवक संस्था पुणे, वारसा अंजनगाव व वनस्पती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित केलेला रानभाजी २०२२ महोत्सव पार पडला. प्राचार्य डॉ संजय खरात यांनी निसर्ग सेवक संस्था यांच्याशी चर्चा करुन रानामधे उगवणाऱ्या रानभाज्यांचा परंपरेने होणारा वापर व त्या जपण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांची ओळख नविन पिढीला व्हावि या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरविले.याचे उद्धाटन रवी वानखेडे, मुख्य वनसंरक्षक, शिक्षण व प्रशिक्षण वनविभाग पुणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी रवी वानखेडे म्हणाले रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना पोहोचावी व त्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन जतन व्हावी, त्यांचे संवर्धन व्हावे यासाठीचा हा प्रयत्न आहे. अशी दुर्मिळ माहिती संकलित करुन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी मदत करतील.रानभाज्यां व स्थानिक लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर त्याचा फायदा सर्वाना मिळेल.

डाॅ सतिश पुणेकर, प्रेसिडेंट बायोस्फेअर
म्हणाले हा आदिवासींची संस्कृतीचा नैसर्गिक व जैविक वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अशी प्रदर्शने भरविली जातात. ही संस्कृती नष्ट होऊ नये म्हणून असे प्रयत्न आम्ही सतत करत राहू.

या प्रदर्शनासाठी खोसते गाव,शहापूर ठाणे येथील सौ नयना अशोक भुसारे, मंजुळा विलास भुसारे, सुनिता सदाशिव महाले आणी अशोक मारुति भुसारे यांनी नळीची भाजी, हाडासांधी, माकडशिंगी,करटोल, कुर्डू,कौला, बरकी, केना, घोळु, भ्रामी, भारंगी, चावा, मोर, भाजी, बारडोला, काळा, आळू, चिचार्डे या रानभाज्या आणल्या होत्या. या सर्व भाज्या कशा करायच्या व त्याचे आर्युवेदीक फायदे काय आहेत हे त्यांनी समजावून सांगितले.

डॉ विनया घाटे यांच्या रानभाजी संवर्धनासाठी केलेल्या कामतून या प्रदर्शनासाठी कल्पना साकारली. याचा हेतू सांगताना डॉ विनया घाटे म्हणाल्या विविध रानभाज्यांचे वैभव टिकून रहावे व त्यांचे औषधि गुणधर्म सगळ्यां पर्यंत पोहोचावे म्हणुन आम्ही अथक प्रयत्न करत राहू प्राचार्य डाॅ संजत खरात यांनी प्रदर्शन घेण्यामागे विदेशी भाज्यापेक्षा देशी भाज्या आरोग्याला चांगल्या असतात. त्यांचे संरक्षण व संवर्धन निसर्ग प्रेम वाढल्याने शक्य होईल व प्रदर्शनामुळे सगळेच निसर्गाच्या जवळ जातील अशी भावना व्यक्त केली.

See also  नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

या प्रसंगी खोसते गावच्या सरपंच सौ नयना भुसारे म्हणाल्या शहरातल्या लोकांना रानभाज्या कश्या बनवितात हे माहिती नसते. आम्हाला जर एखादा स्टाॅल दिला तर आम्ही नक्की तुमच्या पर्यंत पोहोचू. तुमचे आमच्या गावी स्वागत आहे. हा ठेवा तुमच्यापर्यंत पोहोचावे ही आमची इच्छा आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन डॉ प्राची क्षीरसागर यांनी केले. विभाग प्रमुख डाॅ प्राची रावळ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला माॅडर्न शाळा गणेशखिंड व NCL, माॅडर्न महाविद्यालय, बाॅटनी विभाग, शिवाजीनगर, विद्यापीठ बाॅटनी विभाग व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी भेट दिली याशिवाय नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला
साधारणपणे ३०० निसर्गप्रेमी नागरिक विद्यार्थी यांनी प्रदर्शनाला भेट दिली.