नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे अल्पशा आजाराने निधन

0

औंध :

पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचं अल्पशा आजाराने निधन दि. 22-12-2020 मंगळवार रोजी झाले आहे.

विजय शेवाळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रतिनिधित्व करत होते औंध बोपोडी परिसरातील अनेक प्रश्न नागरिकांच्या समस्या त्यांनी मार्गी लावल्या. नगरसेवक बरोबरच ते एक उद्योजक ही होते. माजी महापौर सुरेश शेवाळे यांचे ते बंधू होत.

त्यांनी औंध प्रभाग समिती अध्यक्ष, विधी समिती, क्रीडा समिती असे पालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिले होते.

See also  देशाच्या विकासाच्या दृष्टीने नॅचरल गॅसचा वापर जास्तीत जास्त करणे आवश्यक : राजेश पांडे