सलग सहाव्या महिन्यात जीएसटी संकलन १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त

0

नवी दिल्ली :

सप्टेंबर महिन्याची सुरुवात केंद्र सरकारसाठी चांगली ठरत आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी सादर केली. वस्तू आणि सेवा कर संकलन ऑगस्टमध्ये 28 टक्क्यांनी वाढून 1.43 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. सलग सहाव्या महिन्यात जीएसटी संकलन १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

आर्थिक पुनरुज्जीवनाचा GST महसुलावर सकारात्मक परिणाम होत आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये एकूण GST महसूल 1,43,612 कोटी रुपये होता. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ऑगस्टमधील संकलन 1.43 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच महिन्यात मिळालेल्या 1,12,020 कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा 28 टक्के अधिक आहे.

सलग सहाव्या महिन्यात उत्तम संकलन : वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट 2022 हा सलग सहावा महिना आहे, जेव्हा GST संकलन 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. हे संकलन जुलै 2022 च्या तुलनेत 4 टक्के कमी आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये सरकारला जीएसटीमधून 1,48,995 कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी, जून 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,44,616 कोटी रुपये होते. याच्या एक महिना आधी म्हणजेच मे २०२२ मध्ये सरकारला जीएसटीमधून १.४० लाख कोटी रुपये मिळाले होते. यावर्षी एप्रिलमध्ये जीएसटीने सर्वाधिक वसुली करण्याचा विक्रम केला होता. एप्रिल 2022 मध्ये सरकारला जीएसटीमधून 1.68 लाख कोटी रुपये मिळाले.

सर्वाधिक वसुलीचा विक्रम : यावर्षी एप्रिलमध्ये जीएसटीने सर्वाधिक वसुली करण्याचा विक्रम केला होता. एप्रिल 2022 मध्ये सरकारला जीएसटीमधून 1.68 लाख कोटी रुपये मिळाले. मार्च २०२२ मध्येही अप्रत्यक्ष करातून १.४२ लाख कोटी रुपये मिळाले. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन १.३३ लाख कोटी रुपये होते.

See also  शिवसेने उघडले महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं