बाणेर नागरी सहकारी पतसंस्था बँकिंग क्षेत्राबरोबरच गरजूंना मदतीसाठी अग्रेसर : ममता सिंधुताई सपकाळ

0

बाणेर :

बाणेर नागरी सहकारी पतसंस्था बाणेर च्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘भैरवनाथ पुरस्कार’ गुरुवारी कुंदन गार्डन मंगल कार्यालय बाणेर येथे संपन्न झाला. यावेळी धार्मिक, सामाजिक, सहकार, क्रिडा, शैक्षणिक, कायदे विषयक, उद्योग, कृषी, माजी सैनिक, गो सेवक, करोना योद्धा, आणि आदर्श माता असे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तींना भैरवनाथ पुरस्कार देऊन हभप निवृत्ती महाराज देशमुख, ममता सिंधुताई सपकाळ तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गौरविण्यात आले.

प्रस्तावनेमध्ये बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक डॉक्टर दिलीप मुरकुटे यांनी संस्थेच्या प्रारंभापासून तर आजतागायत गेल्या 24 वर्षात संस्थेने केलेल्या कामाचा आढावा सांगितला तसेच बँकिंग क्षेत्राबरोबरच संस्था करत असलेल्या इतर सामाजिक कामांची माहिती देखील डॉक्टर दिलीप मुरकुटे यांनी याप्रसंगी दिली.

संकट समयी हक्काने धाऊन येणारे दिलीप भाऊ माईंना (सिंधुताई सपकाळ) नेहमीच जवळचे वाटत. बाणेर नागरी पतसंस्था व दिलीप भाऊ मुरकुटे यांनी माईंना घराघरात पोहचवले. प्रत्येक अडचणी वेळी हक्काचा भाऊ म्हणून नेहमीच माई दिलीप भाऊ कडे पाहत असत. भाऊंनी नेहमीच मदती साठी तत्परता दाखवली आहे. असे ममता सिंधुताई सपकाळ यांनी कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बँकिंग क्षेत्राबरोबरच समाजाभिमुख काम करत विविध गरजूंना नेहमीच मदतीसाठी बाणेर नागरी पतसंस्था विविध उपक्रमात अग्रेसर असते. पथसंस्तेचे उपक्रम कौतुकास्पद आहे. ९०० रुपये ठेवीपासून सुरू झालेला बाणेर नागरी पतसंस्थेचा २४ वर्षाचा प्रवास हा आज अडीचशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचला, ही बाणेर नागरी पतसंस्थेसाठी व सभासदांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे म्हणाले की बाणेर नागरी पतसंस्थेचा २४ वर्षांचा प्रवास गौरवास्पद आहे. बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांनी बँकेच्या कामांबरोबरच समाजातील वंचित घटकांसाठी जो मदतीचा हात देत आहेत त्यामुळे अपंग तसेच गरजू नागरिकांना त्यातून मोलाची मदत होत आहे. डॉ. दिलीप मुरकुटे यांचे सामाजिक काम गौरवास्पद आहे.

See also  बाणेर मुरकुटे गार्डन रस्त्यावर ज्येष्ठ दाम्पत्याने सोनसाखळी चोराला नागरिकांच्या मदतीने पकडले.

यावेळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

भैरवनाथ पुरस्कार मानकरी
ह भ प शिवाजी मोरे, निवृत्ती कोळेकर, बबन महाराज खेडकर, हिरामण पाडाळे, पांडुरंग पारखे, बाळासाहेब लोखंडे, नंदाराम बालवडकर, मंदाकिनी बालवडकर, शारदाबाई कोळेकर, रोहिदास शेडगे, भगवान खैरे, बाळू पंचमुख, अमरजीत बोरावके, नारायण चांदेरे, रियाझ मुल्ला, गिरीश देशमुख, डॉ. रेवती भामरे, ॲड. माणिक रायकर, ॲड. गणेश रानवडे, लक्ष्मण पाडाळे, गिताताई गुजर, कालिदास मानमोडे, मारुती गोळे, गणेश सायकर, गिरीष उर्फ आनंद बिश्नोई, कैलास खांदवे, सिध्देश्वर हगवणे, वसंत चांदेरे, शिवाजी चिव्हे, मेहबूब शेख, चित्रा अभंकर, अजिंक्य बालवडकर

यावेळी पुणे बार असोसिएशन अध्यक्ष पांडुरंग थोरवे, माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, अशोक मुरकुटे, संतोष मोहोळ, पतसंस्थेचे अध्यक्ष राजू शेडगे, उपाध्यक्ष संजय ताम्हाणे, शाखा अध्यक्ष वृषभ मुरकुटे, हिंजवडी शाखा अध्यक्ष यशवंत साखरे, पिरंगुट शाखा अध्यक्ष राम गायकवाड, देहू शाखा अध्यक्ष सागर भसे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपलक्ष्मी बेळगावकर, ॲड. दिलीप शेलार, संचालक विजय विधाते, बाळासाहेब भांडे, कैलास आटोळे, आकाश धनकुडे, गणेश मुरकुटे, शितल भुजबळ, रुपाली सायकर, नामदेव कळमकर, सतिश मराठे, उज्वला साबळे, रंगनाथ ताम्हाणे, शुभांगी सावंत, ॲड. लीना मुरकुटे पाटील, ॲड. संदीप सावंत, ॲड. रविंद्र इंगळे, तसेच संस्थेचा कर्माचारी, सभासद आणि विविध राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.