पुणे येथील कमिन्स महाविद्यालयात सावरी शिंदेने राष्ट्रीय पातळीवर पटकावले 4 सुवर्णपदक

0

पुणे :

पुणे येथील कमिन्स महाविद्यालयात कम्प्युटर ईंजीनिअरींग तृतीय वर्षात शिकणाऱ्या सावरी सूर्यकांत शिंदे हिने नॅशनल क्लासिक जूनियर वुमन पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये चार सुवर्णपदके पटकावली.

वीस वर्षीय सावरिने स्कॉट-157.5 किलो उचलून सुवर्णपदक, डेड लिफ्ट-165 किलो सुवर्णपदक, बेंच प्रेस-77.5 किलो सुवर्णपदक असे एकूण ४०० किलो वजन उचलण्याची अव्वल कामगिरी केली असून चार सुवर्ण पदक राष्ट्रीय स्तरावर मिळविले आहे.

ही स्पर्धा केरळ मध्ये १० ते १४ ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. या क्रीडाप्रकारासाठी सावरी स्पार्क जिम मधे सराव श्री प्रशांत जगताप सर यांच्या मार्गदर्शनात घेत आहे. तसेच केरळमध्ये स्पर्धेत महाराष्ट्र टीमसोबत आलेले श्री विजय पाटील सर व नितीन म्हाळसकर सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

 

See also  इंग्लंड आणि भारत यांच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 मध्येही प्रत्येकी दोन गुण वजा