बिहार मध्ये महाआघाडी सरकारने बुधवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला

0

बिहार :

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारने बुधवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. बिहार विधानसभेत आज कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेण्यात आली.

उल्लेखनीय म्हणजे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘महागठबंधन’ आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टपूर्वी भारतीय जनता पक्षाचे विजय कुमार सिन्हा यांनी आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विजय कुमार सिन्हा आपल्या पदावरुन पायउतार झाले आहेत. २४३ सदस्यीय विधानसभेतील १६५ आमदारांनी नितीश कुमार यांना पाठिंबा दिला आहे. सिन्हा यांनी असा दावा केला की, अचानक सरकार बदलल्यानंतर त्यांना स्वतःहून राजीनामा द्यायचा होता. पण अविश्वास प्रस्ताव आणल्याचे कळल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिन्हा घाईघाईने सभागृहातून बाहेर पडले. यावेळी भाजपच्या आमदारांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या.

बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान नितीशकुमार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आज स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारे स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी कुठे होते, असा सवाल नितीश यांनी केला. त्यानंतर भाजपने सभागृहातून सभात्याग केला.

See also  राज्यात २ दिवसाचं अधिवेशन तर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द ....