ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला फिफा ने केले निलंबित

0

नवी दिल्ली :

भारतीय फुटबॉलपटू आणि चाहत्यांना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉलने मोठा धक्का दिला आहे. फिफाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला तत्काळ निलंबित केले आहे.

काय आहे यामागील कारण ? चला पाहूया.

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला (AIFF) इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉलने १९४८ मध्ये मान्यता दिली होती. मात्र १६ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला तत्काळ निलंबित करण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने फिफाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर येत्या ऑक्टोबर महिन्यात फिफा अंडर -१७ महिला विश्वचषक स्पर्धा पार पडणार होती. या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळणार होते. मात्र कारवाईनंतर हे यजमानपद देखील काढून घेण्यात आले आहे.

फिफाने याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले की, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला (AIFF) अनावश्यक हस्तक्षेप केल्यामुळे तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फिफाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच याबाबत चेतावणी दिली होती. मात्र आता सर्वांच्या सहमतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद काढून घेणार..

येत्या ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान गोवा आणि मुंबई येथे फिफा अंडर -१७ महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र या निर्णयानंतर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने यजमानपद देखील गमावले आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने रविवारी (१४ ऑगस्ट) रोजी म्हटले होते की,भारतीय खेळाडूंनी फिफा निलंबित करण्याच्या धमक्या देत आहे. त्यावर लक्ष देऊ नका, मैदानात सर्वश्रेष्ठ कामगिरी कशी करता येईल यावर अधिक लक्ष केंद्रित करा.

भारतीय फुटबॉल संघाच्या क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर, फिफाच्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १०४ व्या स्थानी आहे.

See also  दक्षिण आफ्रिकेने केला भारतीय संघाचा ७ गडी राखून पराभव.