राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने मिळवली २२ सुवर्ण पदकासह एकूण ६१ पदके

0

बर्मिंगहम

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेच्या अखेरीस भारत चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता. यंदा स्पर्धेत काही नव्या चेहऱ्यांसह दिग्गज खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली… पण भारत सर्वात यशस्वी ठरलेली शूटींग स्पर्धा यंदा कॉमनवेल्थमध्ये नसल्याने भारताच्या पदकतालिकेवर मोठा फरक पडला. पण याऊलटही भारताने दमदार कामगिरी करत चौथं स्थान मिळवलं. तर नेमकी भारतासाठी कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 कशी होती यावर एक नजर फिरवूया…

भारताने क्रीडा प्रकारानुसार मिळवलेली पदके
कुस्ती : 6 सुवर्ण 1 रौप्य तर 5 कांस्य एकूण 12

वेटलिफ्टिंग : 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य एकूण 10

ॲथलेटिक्स पॅरा ॲथलेटिक्स : 1 सुवर्ण 4 रौप्य 3 कांस्य एकूण 8

बॉक्सिंग : 3 सुवर्ण 1 रौप्य 3 कांस्य एकूण 7

टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस : 4 सुवर्ण 1 रौप्य 2 कांस्य एकूण 7

बॅडमिंटन : 3 सुवर्ण 1 रौप्य 2 कांस्य एकूण 6

ज्यूदो : 2 रौप्य, 1 कांस्य एकूण 3

लॉन बॉल्स : 1 सुवर्ण 1 रौप्य एकूण 2

स्क्वॉश : 2 कांस्य एकूण 2

हॉकी : 1 रौप्य 1 कांस्य एकूण 2

पॅरा पॉवरलिफ्टिंग : 1 सुवर्ण

महिला क्रिकेट : 1 रौप्य

भारताची पदकसंख्या : 61

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मधील भारताचे पदक विजेते

1. संकेत महादेव- रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)

2. गुरुराजा- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 61 किलो)

3. मीराबाई चानू- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 49 किलो)

4. बिंदियाराणी देवी- रौप्य (वेटलिफ्टिंग 55 किलो)

5. जेरेमी लालरिनुंगा – सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 67 किलो)

6. अचिंता शेउली – सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 73 किलो)

7. सुशीला देवी – रौप्य पदक (जुडो 48 किलो)

8. विजय कुमार यादव- कांस्य (जुडो 60 किलो

9. हरजिंदर कौर – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 71 किलो)

10. महिला संघ – सुवर्णपदक (लॉन बॉल्स)

11. पुरुष संघ – सुवर्णपदक (टेबल टेनिस)

12. विकास ठाकूर – रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 96 एमआय)

13 . रौप्य पदक (बॅडमिंटन)

See also  वर्ल्ड ऍथलेटिक्सचा 'वुमन ऑफ द इयर' पुरस्कार मिळवून लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने पुन्हा एकदा उंचविले देशाचे नाव

14. लवप्रीत सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109 किलो)

15. सौरव घोषाल – कांस्य पदक (स्क्वॉश)

16. तुलिका मान – रौप्य पदक (जुडो)

17. गुरदीप सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109+ किलो)

18. तेजा शंकर- कांस्य पदक (उंच उडी)

19. मुरली श्रीशंकर- रौप्य पदक (लांब उडी)

20. सुधीर- सुवर्ण पदक (पॅरा पॉवरलिफ्टिंग)

21. अंशू मलिक – रौप्य पदक (कुस्ती 57 किलो)

22. बजरंग पुनिया- सुवर्णपदक (कुस्ती 65 किलो)

23. साक्षी मलिक- सुवर्णपदक (कुस्ती 62 किलो)

24. दीपक पुनिया- सुवर्णपदक (कुस्ती 86 किलो)

25. दिव्या काकरन – कांस्य पदक (कुस्ती 68 किलो)

26. मोहित ग्रेवाल – कांस्य पदक (कुस्ती 125 किलो)

27. प्रियांका गोस्वामी – रौप्य पदक (10 किमी चालणे)

28. अविनाश साबळे – रौप्य पदक (स्टीपलचेस)

29. पुरुष संघ – रौप्य पदक (लॉन बॉल)

30. जास्मिन लॅम्बोरिया – कांस्य पदक (बॉक्सिंग)

31. पूजा गेहलोत – कांस्य पदक (कुस्ती 50 किलो)

32. रवी कुमार दहिया- सुवर्णपदक (कुस्ती 57KG)

33. विनेश फोगट- सुवर्णपदक (कुस्ती 53 किलो)

34. नवीन कुमार- सुवर्णपदक (कुस्ती 74 किलो)

35. पूजा सिहाग- कांस्य पदक (कुस्ती)

36. मोहम्मद हुसामुद्दीन – कांस्य पदक (बॉक्सिंग)

37. दीपक नेहरा- कांस्य पदक (कुस्ती 97 किलो)

38. सोनलबेन पटेल – कांस्य पदक (पॅरा टेबल टेनिस)

39. रोहित टोकस- कांस्य पदक (बॉक्सिंग)

40. भाविना पटेल- सुवर्णपदक (पॅरा टेबल टेनिस)

41. भारतीय महिला संघ- कांस्य पदक (हॉकी)

42. नीतू घनघास – सुवर्णपदक (बॉक्सिंग)

43. अमित पंघल- सुवर्णपदक (बॉक्सिंग)

44. संदीप कुमार – कांस्य पदक (10 किमी चालणे)

45. अल्धॉस पॉल – सुवर्णपदक (तिहेरी उडी)

46. ​​अब्दुल्ला अबुबकर – रौप्य पदक (तिहेरी उडी)

47. अन्नू राणी – कांस्य पदक (भालाफेक)

See also  दिल्ली कॅपिटल ची चेन्नई सूपर किंग्स वर दणदणीत मात

48. निखत जरीन- सुवर्णपदक (बॉक्सिंग)

49. अचंत आणि जी. साथियान – रौप्य पदक (टेबल टेनिस)

50. सौरव आणि दीपिका पल्लीकल – कांस्य पदक (स्क्वॉश)

51. किदाम्बी श्रीकांत – कांस्य पदक (बॅडमिंटन)

52. महिला संघ – रौप्य पदक (क्रिकेट)

53. गायत्री आणि त्रिशा जॉली – कांस्य (बॅडमिंटन)

54. अचंत आणि श्रीजा अकुला- सुवर्णपदक (टेबल टेनिस)

55. सागर अहलावत – रौप्य पदक (बॉक्सिंग)

56. पीव्ही सिंधू- सुवर्णपदक (बॅडमिंटन)

57. लक्ष्य सेन- सुवर्णपदक (बॅडमिंटन)

58. जी. साथियान- कांस्य पदक (टेबल टेनिस)

59. सात्विक-चिराग- सुवर्णपदक (बॅडमिंटन)

60. अचंत शरथ कमल – सुवर्णपदक (टेबल टेनिस)

61. भारतीय पुरुष संघ – रौप्य पदक (हॉकी)